ONLINE ADMISSION PROCESS ( ऑनलाईन पद्धती ने प्रवेश प्रक्रिया)

श्री कला, वाणिज्य, आणि विज्ञान महाविद्यालय, रावेर येथील विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून ऑनलाईन पद्धती ने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे-   १) नोंदणी २) प्रवेश निश्चिती.

 

विद्यार्थ्यांनी नोंदणी व प्रवेश निश्चिती बाबत खालील दिलेली सूचना वाचून मग नोंदणी साठी खालील बॉक्स click here for online admission वर क्लिक करावे

** सूचना **

नोंदणी : -

  • खालील बॉक्स click here for online admission वर क्लिक केल्यानंतर Register now येथे क्लिक करून  विचारलेली माहिती भरावी. 

          (येथे महत्वाची सूचना म्हणजे आपण दिलेला मोबाइल नंबर आणि ई-मेल id हे कायम स्वरूपी वर्षभरात हेच असणे गरजे चे आहे अन्यथा येणारे OTP व sms आपल्या पर्यंत                        पोहचणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. रजिस्ट्रेशन (नोंदणी) प्रत्येकास अनिवार्य आहे, त्यासाठी रु - ५० /- , फी निर्धारित केलेली आहे, फी भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन (नोंदणी)              पूर्ण होणार नाही आणि फॉर्म सुद्धा प्रिंट होणार नाही. )

  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर  परत महाविद्यालया चा वेबसाईट www.svsncollegeraver.org च्या HOME पेज वरclick here for online admission वर क्लिककेल्यानंतर ADMISSION पेज जेथे सूचना दिलेल्या आहे त्याच्या खाली click here for online admission वर क्लिक करून user name आणी password चा साह्याने STUDENT LOGIN मधून SIGN IN करणे व सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे.

            (फॉर्म भरताना COURSE मध्ये प्रथम वर्ष कला मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी B A - 1 . प्रथम वर्ष वाणिज्य मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी B COM - 1 व त्याचबरोबर प्रथम वर्ष                 विज्ञान मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी B SC - 1 हे विकल्प भरणे. द्वितीय वर्ष कला मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी B A - 3 . द्वितीय वर्ष वाणिज्य मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी                 B.COM - 3 व त्याचबरोबर द्वितीय वर्ष विज्ञान मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी B SC - 3 हे विकल्प भरणे तृतीय वर्ष कला मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी B A - 5 . तृतीय वर्ष                       वाणिज्य मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी B.COM - 5 व त्याचबरोबर तृतीय वर्ष विज्ञान मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी B SC - 5 हे विकल्प भरणे अनिवार्य आहे.)

प्रवेश निश्चिती:नोंदणी फी व संपूर्ण फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर, फॉर्म सोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी महाविद्यालयांकडुन करण्यात येईल व नोंदणी च्या २४-४८ तासात sms                        पाठविण्यात येईल. sms मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालया चा वेबसाईट www.svsncollegeraver.org च्या HOME पेज वर Click here for online fees ह्या                          बॉक्स वर क्लिक करून फी भरता येईल व प्रवेशाचे पैसे भरून प्रवेश निश्चित करता येईल. 

 

हि सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यास घरूनच त्याच्या अँड्रॉईडमोबाईल फोनवरून करता येणार आहे. हे तूर्त प्रवेश आहे जेंव्हा शासन आणि विद्यापीठ विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये येण्याची परवानगी देईल तेव्हा मूळ कागद पत्रांसह प्रवेश फॉर्म व फी भरल्याची पावती सादर केल्यानंतर प्रवेश निश्चिती होईल.